भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीत आग ७ जणांचा मृत्यू १५ जण जखमी
मुंबई :- मुंबईतील ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाच्या बाजूला इमारतीमध्ये आग लागली आहे. या आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून. या २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली आहे.
आज पहाटे साडेसात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.घटनास्थळी १३ फायर इंजिन ७ जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
आज सकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली . आग लागल्यानंतर इमारतीची पूर्ण लाईट गेली. बाहेर पाहिलं तर मोठ्या धूर पाहायला मिळत होता आणि आग लागल्याची माहिती मिळताच सगळेजण इमारतीच्या खाली आले. प्रत्येक मजल्यावर सहा घर आहेत. या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे २० ते २२ रहिवासी राहात असतील. आता सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे, असं तिथल्या रहिवाशांनी सांगितलं.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाकडून होत असून आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकल्याची भीती आहे. तसेच आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.