news

भारताच्या ६६ वर्षीय क्रिकेटपटूने केले, ३८ वर्षीय तरुणीसोबत लग्न

Share Now

 

भारताचे माजी क्रिकेटपटू अरुण लाल पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकले . वयाच्या ६६ व्या वर्षी लग्न करणार हे ऐकून तुम्हाला नक्कीच थोडं विचित्र वाटेल, पण माजी क्रिकेटर अरुण लाल यांनी ते खरं करून दाखवलं आहे. अरुण लाल २ मे २०२२ रोजी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. भारताचा माजी क्रिकेटर अरुण लाल यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नाच्या छायाचित्रे समोर आली आहेत.

हेही वाचा :- राजकीय सल्लागार प्रशांत किशोर स्वतःचा पक्ष स्थापन करणार ?

या लग्नासाठी त्यांच्या पत्नीनेही अरुण लाल यांना परवानगी दिल्याचे सांगण्यात येत आहे. अरुण लाल यांनी त्यांची मैत्रीण बुलबुल साहासोबत लग्न केल आहे. बंगालचा माजी सलामीवीर ६६ वर्षांचा असताना , त्याच्या सोबत लग्नगाठ बांधणारी बुलबुल ३८ वर्षांची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कपलची जवळपास एक महिन्यापूर्वी एंगेजमेंट झाली होती.

अरुण हे सध्या बंगाल रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. लालचे पूर्वी रीनाशी लग्न झाले होते, परंतु ते परस्पर संमतीने वेगळे झाले. यानंतर ती आता बुलबुलसोबत लग्न केले , ती बराच काळ शिक्षिका म्हणून काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी गेल्या महिन्यात एंगेजमेंट केली होती आज त्यानी लग्न गाठ बांधली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02cKq1MZStwRDfwcGQGLnyV9mn42mM68aXVRD6MoT8YPMg71iFojJGFyNm2UqCq24kl&id=100016852382425

अरुण लाल यांनी १९८२ ते १९८९ दरम्यान १६ कसोटी सामने आणि १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते .

हे ही वाचा (Read This) Summer Special : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी प्या नारळपाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *