भारतीयांना मिळणार लवकरच 5G सेवेचा आनंद, सरकारने दाखवले हिरवे कंदील
भारतात 5G बद्दल चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे आणि 5G येण्यापूर्वी अनेक कंपन्यांनी 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आनंद होईल की सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. जे देशात दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणेल. लिलावासाठी, दूरसंचार मंत्रालय या आठवड्यात इच्छुक दूरसंचार कंपन्यांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करेल.
चंद्रपुरात हॉरर हत्याकांड, सेलोटेपने हातपाय बांधून मृतदेह ठेवला शाळेत
केंद्रीय मंत्रिमंडळाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, ’20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा जुलै अखेरपर्यंत लिलाव केला जाईल’. नेटवर्कच्या स्थापनेला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रॉडबँड विशेषत: मोबाइल ब्रॉडबँड नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, असे मंत्रिमंडळाने म्हटले आहे. 2015 पासून देशभरात 4G सेवांच्या जलद विस्तारामुळे याला मोठी चालना मिळाली आहे. 2014 मध्ये 100 दशलक्ष ग्राहकांच्या तुलनेत आज 800 दशलक्ष ग्राहकांना ब्रॉडबँडचा वापर आहे. याच्या मदतीने सरकार मध्यमवर्गीय कुटुंबांपर्यंत मोबाईल बँकिंग, ऑनलाइन शिक्षण, टेलिमेडिसिन, ई-रेशन इत्यादींचा प्रसार करण्यास सक्षम आहे.
खरीपात कांद्यापेक्षा कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचं जास्त लक्ष, असे का ? वाचा एकदा
अहवालात असेही म्हटले आहे की देशात तयार केलेली 4G इकोसिस्टम आता 5G स्वदेशी विकासाकडे वाटचाल करत आहे. मोबाईल हँडसेट, दूरसंचार उपकरणांसाठी PLI (उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह) योजना आणि भारत सेमीकंडक्टर मिशनच्या शुभारंभामुळे भारतात 5G सेवा सुरू करण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे. 5G तंत्रज्ञान आणि आगामी 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत एक आघाडीचा देश म्हणून उदयास येण्याची वेळ दूर नाही.
काय फरक आहे 4G आणि 5G मध्ये
सध्या बहुतांश लोक 4G सेवा वापरतात त्यात मुळात 4G चा अर्थ फोर्थजनरेशन असा होतो, सामान्यतः सांगायचं तर इंटरनेट परिवाराची हि चौथी पिढी, यात बहुतांश कंपन्या असा दावा करतात कि २० एमबी प्रति मिनिट याची स्पीड असेक मात्र तसे काही होत नाही, आता 5G मध्ये काय वेगळे पण असेल. तर अनेकांचा असा दावा आहे कि 4G पेक्षा 5G दहापट वेगाने चालेल.