कडाक्याच्या थंडीत ४ दिवस १ वर्षाचे बाळ पुलाखाली; ग्रामस्थांनी दिले जीवदान
रत्नागिरी : राज्यच नवजात बाळांबद्दल घडणाऱ्या घटना खूप घाट आहे. ग्राभपत असो कि रस्त्यावर बाळाला सोडून जाणे असो, अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथील स्टॉपजवळील पुलाच्या खाली हे १ वर्षाचे स्त्री जातीचे बाळ मिळाले. हे बाळ तब्बल ४ दिवसांपासून तीथेच पडून रडत होते. जेव्हा गावात हि बाब सरपंच यांच्या कानावर गेली कि, पूल जवळ एका बाळाचा रडण्याचा आवाज येतो तेव्हा सरपंच आणि पोलीस पाटील यांनी तेथे जाऊन पाहणी एली असता. तीथे बाळ असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, चार दिवस कडाक्याच्या थंडीत असल्यामुळे त्याचा आवाज बसला होता. ते बाळ अर्धबेशुद्ध अवस्तेथ होते. सरपंच आणि गावकर्यांनी त्याला जवळील शासकीय दवाखान्यात दाखल केले. सध्या बाळाला रत्नागिरी शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दिनेश मुळ्ये, गावप्रमुख प्रभाकर तेगडे, दत्ताराम जाधव, प्रदीप म्हादये, शिवराम दुडये आणि ग्रामस्थ यांनी सरकारी यंत्रणेची वाट न पाहता प्राथमिक उपचार सुरू केले. पुढील तपस पोलीस करत आहे.