जळगाव जिल्ह्यात दबदबा, बघा कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
जळगाव जिल्ह्यात दबदबा, बघा कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
जळगाव जिल्ह्यात महायुतीला क्लीन स्वीप, भाजप आणि शिंदे गटाने सर्व जागांवर घेतली आघाडी
जळगाव जिल्ह्यात राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने मोठा विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीला धोबीपछाड देत महायुतीने जिल्ह्यात सर्व जागांवर आघाडी घेतली आहे, ज्यामुळे विजय निश्चित मानला जात आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांवर महायुतीने जोरदार बाजी मारली आहे.
संभाजीनगर पूर्वमध्ये जलीलची लीड, मराठा आंदोलन आणि मुस्लिम मतांचा जोरदार प्रभाव
जळगाव जिल्ह्यात भाजपला ५, शिवसेना शिंदे गटाला ५ आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला एक जागा मिळाली होती. या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजय प्राप्त करत आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुरेश भोळे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून मंगेश चव्हाण, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून संजय सावकारे, जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन, आणि रावेर विधानसभा मतदारसंघातून अमोल जावळे यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांना पराभूत करून विजय मिळवला आहे.
शिंदे, भाजपा, अजित पवारांचा नोट जिहाद, ठाकरेंचा घणाघात
महायुतीच्या या प्रचंड विजयामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले आहे, आणि राज्यभरात महायुतीच्या प्रभावाची पुनर्रचना झाल्याचे दिसते.