महाराष्ट्र

अग्रदूत लोककलावंतांचा आणि कामगारांचा मेळावा!

Share Now

अग्रदूत लोककलावंतांचा आणि कामगारांचा मेळावा!
तळागाळातल्या लोककलावंतांना आज अनेक समस्या त्यांची अनेक प्रश्न आहेत, आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी,हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंतर्गत येणाऱ्या चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने अग्रदूत लोककलावंतांचा आणि कामगारांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले..
एम जी एम मध्ये पार पडलेल्या या, अग्रदूत लोककलावंतांच्या मेळाव्याचे नियोजन टी एम टी प्रोडक्शन्स नि केलं…शहरभर कार्यक्रमाच्य प्रसिद्धी साठी लावलेले मोठमोठाले बॅनर हे शहरांमध्ये चर्चेचा विषय ठरले. कार्यक्रमाची सुरुवात हि ज्येष्ठ लोक कलावंत दिलीप खंडेराय यांनी सादर केलेल्या नमनाने झाली , लोककलावंतांच्या या कार्यक्रमात नटराजाची,पारंपरिक वाद्यांचे पूजन करत, शाहीर अजिंक्य लिंगायत आणि कलाकारांनी नांदी गायली,त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले या वेळी भारतीय कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे, चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित,राकेश ठाकुर( सरचिटणीस), चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस शिरीष राणे आणि सरचिटणीस चंद्रकांत विसपुते ,चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशउपाध्यक्ष सचिन अनर्थे, उद्योजक अजिंक्य सावे, जेष्ठ दिग्दर्शक एन चंद्रा ,अभिनेत्री किशोरी शहाणे,अभिनेत्री सुरभी हांडे , संगीतकार अजित परब ,जुबी मॅथ्यू( कायदेशीर सल्लागार),
या सह अनेक सिनेसृष्टीतील कलाकार , आणि अवघ्या मराठवाड्यातून आलेले लोककलावंत उपस्तिथ होते … कार्यक्रम सुरु असताना पारंपारिक वेश भूषेत ,आप आपल्या लोकवाद्यासह मराठवाड्यातून आलेल्या कलाकारांनी आपल नाव नोंदणीसाठी गर्दी केली होती.

इमारती कोसळून कामगार मरतात, त्यांचाही विमा आहे का? घ्या जाणून
मेळाव्यात मराठवाड्यातील अकरा ज्येष्ठ लोककलावंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
प्रसिद्ध संगीतकार प्रख्यात गायक अजित परब यांनी आपल मनोगत या प्रसंगी व्यक्त केल . आपल्या मनोगताचा समारोप त्यांनी माणसाने माणसासम वागणे या गीताने करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे भारतीय कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री विजय हरगुडे यांचे अध्यक्षीय भाषण . कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत सापडलेल्या लोककलावंतांना केलेली मदत असो की युवकांनी मोबाईल पासून विरक्त राहण्याचा केलेला उपदेश एकृण सगळ भाषण ऐकताना सभागृह स्तब्ध झालं होता माननीय विजयजी हरगुडे यांच्या भाषणाची तारीफ प्रसिद्ध दिग्दर्शक यान चंद्रा यांनी देखील केली..

काँग्रेसने महाराष्ट्रातील 172 जागांचा आढावा घेतला, MVA मध्ये जागावाटपावर नाना पटोले यांनी दिले मोठे विधान.

विजय हरगुडे यांनी प्रसिद्ध कलावंत आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या मध्ये प्रारंभी एक संवाद सत्र घडून आणले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिलं असे मा. अजिंक्य अतुलजी सावे यांचे विशेष आभार हरगुडे यांनी मानले नंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी मराठवाडा विभागाचे संयोजक कुंजुबिहारी अग्रवाल , प्रभारी मराठवाडा चित्रपट कामगार आघाडी शौकत पठाण, छत्रपती संभाजीनगर चे चित्रपट कामगार आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. आशा साकोळकर ,चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशउपाध्यक्ष सचिन अनर्थे, त्यांची सगळी टीम , सोबतच भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अंतर्गत येणाऱ्या चित्रपट आघाडी चे मान्यवर पदाधिकारी
,राकेश ठाकुर( सरचिटणीस)
,किरण बोरकर (उपाध्यक्ष),अस्मिता पेशकर( उपाध्यक्ष),अर्णव मुखर्जी( सचिव),तसेच भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे सन्माननीय सरचिटणीस हनुमंत आण्णा लांडगे,सरचिटणीस प्रदीप पाटील,उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर, उपाध्यक्ष श्याम पुसदकर, उपाध्यक्ष चेतन तायडे,उपाध्यक्ष ॲड भुषण पाटील,सचिव नितीन जांभळे,सचिव आशिष ढोमणे पाटील,सदस्य साहेबराव निकम,सदस्य राहुल जाधव सदस्य किशोर खिल्लारे
सदस्य राजाराम पाटील आदी मान्यवर पदाधिकारी यांनी अधिक परिश्रम घेतले किंबहुना याच परिश्रमा मुळे कार्यक्रम यशस्वी झाला आहे ही गेल्या आठ दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत होती आणि कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला .

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *