२१ व्या वर्षी व्यवसायाला सुरवात ६ वर्षात झाली अब्जाधीश

कॅनडातील ओंटारीतल्या एका २७ वर्षीय मुलीने अवघ्या सहा वर्षात कोट्यवधींची संपत्ती मिळवली आहे. लिंडा बायटिकी नावाच्या २१ वर्षीय मुलीने ४ करोड पेक्षा कमी रकमेत रियल इस्टेटच्या कामाला सुरुवात केली आणि आता अवघ्या ६ वर्षात तिची संपत्ती १२० कोटींची झाली. लिंडा आता स्वतःचे वर्णन रिअल इस्टेट गुंतवणूकदार आणि प्रशिक्षक म्हणून करते.

लिंडा इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर लिंडाफायनान्सी नावाने अकाउंट आहे आणि लोकांना व्यवसायात टिप्स देते .लिंडाचा दावा आहे कि तिच्याकडे सुमारे १८ फ्लॅट्स आहेत. लिंडाने फ्लॅट भाडे तत्वावर दिले. टिकटॉक वर एका विडियोत तिनी सांगितलं कि तिनी १२० कोटी कमवले. लिंडाने खुलासा केला की इतके पैसे कमावण्यापर्यंतचा तिचा प्रवास खूप रंजक होता. यासाठी लिंडाला नोकरीही सोडावी लागली.
आजपर्यंत तिच्याकडे इतका पैसा आहे कि एक लॅव्हिश लाईफ ती जगत आहे.

पण इतका पैसा तिने कसा कमावला असेल ? लिंडा सांगितले की, – “खरेदी करा, नूतनीकरण करा, भाड्याने द्या, पुनर्वित्त करा ” या पावलांचा आधार घेतला आणि त्यामुळे चांगली प्रगती झाली . अनेकांच्या मनात शंका असते की त्यांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करावी की नाही? लिंडाने स्पष्ट केले की रिअल इस्टेट खरोखरच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक आहे.

यावर लिंडा म्हणाली की, जर तुम्हाला चांगले परिणाम हवे असतील तर तुम्हाला सतत त्याच्याशी चिकटून राहून तुमचा पोर्टफोलिओ वाढवावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *