उपमुख्यमंत्री पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात
नाशिकमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजविण्यासाठी बारामती येथील गोविंदबागेत आज पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला जबर धक्का बसला आहे.
सकाळचे हे प्रकरण ताजे असतानाच विदर्भातील महत्त्वाचा आणि खासदार प्रफुल्ल पटेलांचा गृहजिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी आणि प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत लांजेवार यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
आदित्य ठाकरेंनी डिवचलं,शिंदेंनी सुनावलं
नाशिक पाठोपाठ गोंदियात देखील राष्ट्रवादी पक्षाला धक्का
महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशातच प्रफुल्ल् पटेल यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या जवळपास हजार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला असून हा प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का समजला जात आहे. अजय लांजेवार यांनी वंचित कडून 2019 मधे मोरगाव अर्जुनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी 25,000 इतके मतं पडली होती. दरम्यान स्थानिक पातळीवर त्यांची पकड असल्याने त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का समजला जातो आहे.
अंजनीमध्ये शरद पवार दाखल, आबांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन
नवीन नाशिकचे शेकडो पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश
दुसरीकडे नाशिक शहरातील माजी नगरसेवक नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांच्यासह नाशिक पश्चिम विधानसभा, सिडको, नवीन नाशिकच्या शेकडो प्रमुख पदाधिकारीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
Latest: