महाराष्ट्र

बारावीचा पेपर रिचेकींगसाठी ‘हा’ आहे सोपा मार्ग

Share Now

आज बारावीचा निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासोबत या अर्जासाठीचं शुल्कही ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरता येऊ शकेल. त्यासाठी http:verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येऊ शकेल.

हेही वाचा : 

जर छायाप्रत हवी असेल तर प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क. पुनर्मूल्यांकनासाठी ३०० रुपये प्रति विषय इतके शुल्क. गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क असेल. उत्तर पत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्यक असतं. छायापत्र मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत मुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत यश आले नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाईल. परुवणी परीक्षेसाठीदेखील 10 जूनपासून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *