क्राईम बिट

2 दिवसांपूर्वी मुलाचा वाढदिवस, संपूर्ण कुटुंबाने केली आत्महत्या

Share Now

गुजरात न्यूज : दिल्लीतील बुरारीची घटना आजही जनता विसरलेली नाही. एकाच कुटुंबातील 11 जणांनी सामूहिक आत्महत्या केली होती. ही घटना इतकी लोकप्रिय झाली की ओटीटीवर मालिकाही बनवण्यात आली. आता गुजरातमधील मोरबीमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातही एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली आहे. मोरबी शहरातील रावपर रोडवरील चकिया हनुमान मंदिरासमोरील वसंत प्लॉट येथे राहणाऱ्या हार्डवेअर व्यावसायिकाने बायको व मुलासह राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हरेश देवचंद कंबार (57), त्यांची बायको वर्षाबेन हरेशभाई कंबार (55) आणि मुलगा हर्ष हरेशभाई कंबार (20) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य गेटवर करा हा उपाय, महादेव दूर करतील पैशाशी संबंधित सर्व समस्या

मृत हरेशभाई यांचे हार्डवेअरचे दुकान असून दोन दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा हर्ष याचा वाढदिवस होता, असे कुटुंबीयांचे निकटवर्तीय सांगतात. आत्महत्येचे कारण समोर आले नाही. माहिती मिळताच मोरबीचे एसपी पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ए-डिव्हिजन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रावपर रोड परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या ‘फ्लॅट’च्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मृतदेह आढळून आले. त्याने सांगितले की, कंबारच्या भावाने सकाळी फ्लॅटच्या बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये आणि किचनमध्ये मृतदेह पाहिले, त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली.

शिवसेनेसंदर्भात सुनावणीवेळी सरन्यायाधीश का संतापले. 

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. कुटुंबाच्या या कृतीला कोणीही जबाबदार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक (मोरबी) राहुल त्रिपाठी म्हणाले, “प्रथम दृष्टया ही आत्महत्या असल्याचे दिसते, तथापि, आम्ही इतर शक्यता नाकारत नाही आणि आम्ही या प्रकरणाचा तपास करू.”

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *