नाशिकमधील पंजाब नॅशनल बँकेत २ कोटींची विमा फसवणूक, बनावट कागदपत्रांनी उघडले गुपित
नाशिकमधील पंजाब नॅशनल बँकेत २ कोटींची विमा फसवणूक, बनावट कागदपत्रांनी उघडले गुपित
नाशिकमध्ये बँकेतील मोठा अपहार, २ कोटी १२ लाख रुपयांची फसवणूक
नाशिकमधील पंजाब नॅशनल बँकेच्या कॅनडा कॉर्नर शाखेत मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे समोर आले आहे. बँकेच्या हॉल इन्चार्ज पदावर कार्यरत असलेल्या दीपक कोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खातेदारांचे १०६ तोतया वारसदार दाखवले. यामध्ये, मयत खातेदारांच्या नावे बनावट खाते उघडून पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेतील दाव्याची रक्कम बोगस वारसदारांच्या खात्यात वर्ग केली. त्याने याप्रकारे २ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केला आहे.
मनी प्लांट ‘या’ दिशेने लावल्यास घरात कंगाली येण्याची शक्यता, योग्य दिशा जाणून घ्या
बँकेची फसवणूक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर बँक व्यवस्थापक लतिका कुंभारे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, दीपक कोळीने आपल्या पदाचा दुरुपयोग करत बँकेच्या आणि विमा कंपनीच्या नावे बनावट माहिती तयार केली. त्याचबरोबर मयत खातेदारांच्या कुटुंबीयांची फसवणूक करत त्यांची विमा रक्कम अपहारली.
अजित पवारांकडून शिंदेंच्या गावी जाण्यावर स्पष्टीकरण, बघा काय म्हणाले ?
पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दीपक कोळीला अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी जवळपास १ कोटी ७० लाख रुपयांची रिकव्हरी केली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.