newsक्राईम बिट

लग्नात चक्क तलवारीनी राडा, नवरी निघाली अल्पवयीन

Share Now

सेनगाव तालुक्यातील तळणी येथे वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तलवार व लोखंडी रॉडने हाणामारीची घटना घडली. याचा फटका नवरदेवास बसला असून लग्न न करताच नवरदेवास पळ काढावा लागला. त्यात नवरीही अल्पवयीन निघाल्याने लग्न मोडण्याची वेळ आली. ही घटना २८ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.

हेही वाचा : महापालिका नगररचना विभागा प्रभारी अभियंता, लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार,सेनगाव तालुक्यातील तळणी येथील मुलीचे लग्न सापटगाव येथील मुलाशी जुळले होते. हे लग्न वधू पक्षाकडून वेळेवर लावण्याचा आग्रह होता. मात्र वर पक्षाकडील मंडळी वरातीमध्ये नाचण्यात दंग झाली.याच वेळी शाब्दिक वाद सुरु झाला.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वाद विकोपाला गेला. काहींनी चक्क तलवारी काढल्य. या भांडणात जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : उन्हाळ्यात प्या उसाचा रस, पहा काय आहेत फायदे

तसेच महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांनाही पाचारण केले. हे पथक दाखल होताच वधू-वराच्या जन्म तारखेची तपासणी करण्यात आली. वधू अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या पथकाने विवाह रोखत व तत्काळ नियोजित नवरीच्या आई-वडिलाचेवर गुन्हे दाखल करण्यात आले व समुपदेशन केले. नवरदेवानेही लग्न मंडपातून काढता पाय घेतला. लग्नाविनाच परत जाण्याची वेळ नावरदेवावर अली.

या प्रकरणी तालुक्यातील नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. लग्नमंडपात काही महिला बहिणीस जोरजोरात बोलत असल्याच्या उपनिरीक्षक अशोक कांबळे यांचे पथक कारणावरून दोघांना तलवारीने व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी रवी नाथाराव वाकळे (रा. सापटगाव, ता, सेनगाव) यांच्या फिर्यादीवरून राजू खंदारे, अमोल खंदारे (दोघे रा. तळणी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक पोटे तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *