ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये या पदांसाठी भरती, पगार असेल 60 हजार रुपये
BECIL यंग प्रोफेशनल रिक्रूटमेंट 2024: ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत तरुण व्यावसायिकांची भरती केली जाईल. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ मे २०२४ आहे.
NCERT भर्ती 2024: SRA आणि JPF पदांसाठी भरती, करावा लागेल 22 मे पूर्वी अर्ज
या मोहिमेद्वारे, BECIL मध्ये स्टार्ट-अप फेलो, यंग प्रोफेशनल आणि आयटी सल्लागार या पदांसाठी भरती केली जाईल. अभियानांतर्गत एकूण 15 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील डिप्लोमा/बीई/बीटेक/मास्टर पदवी किंवा कोणत्याही नामांकित संस्था किंवा विद्यापीठातून एमएससी किंवा एमसीए असणे आवश्यक आहे.
रेल्वे नोकऱ्या 2024: रेल्वेत भरतीसाठी असा अर्ज करा, मुलाखतीच्या आधारे निवड होईल
भरती मोहिमेअंतर्गत, स्टार्ट-अप फेलोसाठी कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर यंग प्रोफेशनल आणि आयटी सल्लागारांसाठी कमाल वय 32 वर्षे आहे.
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 33,000 रुपये ते 60,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
संदीपान भूमरेंना नापसंती!
या पदांसाठी उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्जाची फी रु 885 आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५३१ रुपये शुल्क आहे.