lifestyle

ईशिता ने जपला गुरूंचा वारसा!

Share Now

गुरुने दिला नृत्यरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा !
या ओळींप्रमाणे आज देवमुद्रा अ मुव्हमेंट स्कूलच्या संचालिका व्ही. सौम्याश्री यांच्या शिष्या ईशिता आणि ईशानी कुलकर्णी अर्थात मृगनयनी सिस्टर्स. या भगिनींनी गुरूंचा वारसा पुढे नेण्याचा जणू वसाच घेतला आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे: हे आरोग्यदायी पेय पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात


देवमुद्राच्या संचालिका व्ही. सौम्याश्री यांच्या गुरु डॉ. राज्यलक्ष्मी सेठ यांना 2015 या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च मानाची ‘टागोर स्कॉलरशिप'(वयोगट 55 वर्ष ते पुढे) केंद्र सरकारतर्फे मिळाली.
यानंतर गुरू व्ही. सौम्यश्री यांना 2017 या वर्षी भरतनाट्यम या नृत्य प्रकारात ‘Senior Research Fellowship’ (वयोगट 40 ते 55 वर्ष) केंद्र सरकारतर्फे देण्यात आली.
त्यांचाच वारसा पुढे नेत कु. ईशानी कुलकर्णी हिला 2019 यावर्षी ‘ज्युनियर आर्टिस्ट स्कॉलरशिप’ ( वयोगट 10 ते 14 वर्ष) केंद्र सरकार तर्फे देण्यात आली.

नोकरीचा इंटरव्ह्यू देण्यापूर्वी या 10 गोष्टी लक्षात ठेवा, मग नोकरी नक्की मिळेल

तिचीच मोठी बहीण कु. ईशिता कुलकर्णी हिला 2023 यावर्षी ‘Young Artist Scholarship'(वयोगट वर्ष 18 ते 25वर्ष ) केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे.
सर्वप्रथम गुरू नानी डॉ. राज्यलक्ष्मी सेठ नंतर गुरु मा व्ही. सौम्याश्री आणि आता ईशिता आणि ईशानी या दोघी भगिनीचे हे यश वाखाणण्याजोगे आहे. भरतनाट्यम नृत्यशैलीत वेळोवेळी मिळणारे गुरूंचे मार्गदर्शन, पालकांची साथ आणि या क्षेत्रासाठी लागणारी चिकाटी, मेहनत,नियमितता यामुळे ईशिता ला हे यश मिळाले आहे.ईशिता सध्या टिळक विद्यापीठ पुणे येथून MA Bharatnatyam करत आहे.आपली साधना करताना या दोघींनाही पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन रुपी आशीर्वाद नेहमीच लाभावेत .त्यांचा वारसा असाच पुढे पुढे जावा हीच सदिच्छा.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *