“उडान” संस्थेतर्फे “ड” से डायबेटीस “ख” से खेलना या पुस्तकाचे लोकार्पण!
जागतिक आरोग्य दिना निमित्त “उडान” संस्थेतर्फे “ड” से डायबेटीस “ख” से खेलना या
पुस्तकाचे लोकार्पण दि.०७-०४-२०३ रोजी जागतिक आरोग्य दिनाचे अवचित्य साधून उडान या
बालमधुमेही साठी कार्यरत संस्थेतर्फे “ड” से डायबेटीस “ख” से खेलना या पुस्तकाचे लोकार्पण डॉ.
भागवत कराड यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. भागवत कराड
केंद्रीय अर्थराज्य मंत्री उपस्तीत होते व सन्माननीय पाहुणे म्हणून डॉ. पी.वाय.मुळे सर उपस्तीत होते.
अक्षय्य तृतीयेला हा उपाय केल्याने पैशाचा भंडार भरतो
“ड” से डायबेटीस “ख” से खेलना हे पुस्तक डॉक्टर, एजुकेटर व मधुमेही साठी काम करणाऱ्या
संस्थानसाठी आहे. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमांतून बालमधुमेही मुलांना मनोरंजक रित्या स्वतःच्या
मधुमेहाची काळजी कशी घ्यावी हे शिकवण्यात येईल. मुलांना हसत खेळत शिकणे आवडते या साठी हे
पुस्तक शिकवण्याचे माध्यम आहे. हे पुस्तक निशुल्क असून संस्थेच्या वेबसाईट वरून डाऊनलोड
करता येईल.
या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे डॉ.श्री भागवतजी कराड साहेब केंद्रीय अर्थ राज्य मंत्री,
सन्माननीय पाहुणे डॉ. पी.वाय.मुळे सर उपस्तीत होते. सोबतच सी.टी.आर. कंपनीचे श्री. अनिल कुमार,
बजाज ग्रुप चे सी.पी.त्रिपाठी उद्योग पती श्री.राय ठट्टा जालना, श्री. स्वामी साहेब, श्री. मुनी शर्मा
(एम.आय.टी) श्री. प्रशांत देसरडा ऑर्थोपेडिक, स्टेपिंग स्टोन स्कूल च्या नसीम मॅडम व सैफुद्दीन सर
टोडलर स्कूल च्या इंसिया हुसैन मॅडम व फैज ए आम ट्रस्ट चे अब्दुल हुसैन सर हि मान्यवर मंडळी
उपस्थित होती.
कंटेंट जितका क्लीन, तितकं चांगलं – सलमान खान
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. भागवत कराड यांनी खूप भावूक होऊन डॉ. अर्चना सारडा
यांच्या “उडान” चे खूप कौतुक केले कि, संभाजी नगर मध्ये अगदी निस्वार्थ पणे अशा प्रकारे काम
केले जात आहे. 1200 मधूमेही मुलांना “उडान” तर्फे निस्वार्थ पणे मदत केली जात आहे. या
कौतुकासोबातच त्यांनी आश्वासन दिले कि, या कामाची माहिती केंद्राला देऊन केंद्रीय आरोग्य मात्रालया
तर्फे याची दाखल घ्यायला सांगू व राष्ट्रीय स्तरावर एक प्रकल्प तयार करण्यासाठी मदतीचे हि
आश्वासन त्यांनी दिले.
तुरुंगात काढलेल्या ‘त्या’ दिवसांची आठवण सांगताना नवनीत राणा भावुक
या सोबतच या कार्याची माहिती शक्य झाल्यास मा. पंतप्रधानांपर्यंत देऊ असे हि आश्वासन
त्यांनी दिले प्रत्येक ठिकाणी “उडान” ची मदत करेल असेही ते म्हणाले
श्री. डॉ. पी.वाय. मुळे सरांनी आपल्या भाषणात सांगितले कि, डॉक्टर अश्या प्रकारचे काम
आपल्या निवृत्ती काळात करतात पण डॉ. अर्चना सारडा या माझ्या विध्यार्थिनी असून त्या याला
अपवाद आहेत. त्या अगदी सुरुवातीपासून या बालमधुमेही साठी काम करत आहेत.
डॉ.अर्चना सारडा यांच्या कार्याचे मला कौटुं वाटत आहे. गेल्या २० वर्षापासून मी हे काम पाहत
आहे. व या २० वर्षामध्ये “उडान” पंख सक्षम झाले आहे याचा मला अभिमान वाटत आहे. असे हि ते
म्हणाले. या पुढे ते म्हणाले कि, “उडान” मध्ये काम करण्यासाठी बाकी डॉक्टरांची संघटन तयार केले तर मी
त्याचे नेतृत्व करायला तयार आहे.
या कार्यक्रमप्रसंगी १ छोटा मुलगा पियुष ज्याला वयाच्या एक वर्षापासून बालमधुमेह आहे. त्याने
गणपती वंदना सादर केली, कु, समृद्धी बंग या मुलीला लहान पणा पासून बालमधुमेह आहे. तिने
“बेख्वाफ जिना हे मुझे” असे म्हणत बालमधुमेहासोबत जीवन जगायच्या इच्छा व्यक्त करत एक
नृत्त्य सदर केले. या सोबत “उडान” च्या पूर्ण टीम ने एक नाटिका सदर केली ज्या मध्ये एका
बालमधुमेही मुलाला समाज कसा त्रास देतो व तो मुलगा जेव्हा “उडान” मध्ये येतो तेव्हा त्याच्या
जीवनास कशी कलाटणी मिलेते याचे सुंदर सादरी कारण केले.
या पुस्तकाची लेखिका कु. मेहेर गिल आहेत ज्या कि एक थीएटर स्टुडंट आहेत. व “उडान”
मध्ये इंटन आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “उडान” चे ट्रस्टी डॉ. अजय बोराळकर, डॉ. क्रांती
रायमाने, डॉ.संपत सारडा डॉ. वृषाली केंकरे, श्री. कुंदन रॉय व संस्थापिका डॉ. अर्चना सारडा व सर्व
“उडान” टीम यांनी परिश्रम घेतले.
Latest: