टॅटू गोंदवल्यानंतर १२ जणांना HIV ची लागण, टॅटू करताना लक्षद्या या गोष्टींवर
बनारसमध्ये टॅटू काढल्यानंतर १२ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. रुग्णालयात दोन महिन्यांत केलेल्या तपासणीत 10 मुले आणि दोन मुलींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. टॅटूमुळे मोठ्या प्रमाणात एचआयव्हीची लागण झाल्याची पुष्टी झाल्याने खळबळ उडाली आहे.
पंजाब नॅशनल बँकेत व्यवस्थापकासह अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या आवश्यक पात्रता
पंडित दीनदयाळ जिल्हा रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांत सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली. आता 12 जण एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मते, संसर्ग होण्याचे कारण म्हणजे टॅटू बनवण्यासाठी संक्रमित सुयांचा वापर. अँटी रेट्रो व्हायरल ट्रीटमेंट सेंटरच्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी काँग्रेस, टीएमसी, आपसह विरोधी पक्षांना पत्र लिहिले म्हणले … धन्यवाद
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संसर्ग झालेल्या सर्व लोकांनी नुकतेच टॅटू काढले होते. त्यानंतर या सर्व लोकांना सतत तापासोबत अशक्तपणा येत होता. सर्वांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्व बाधितांनी फेरीवाले किंवा जत्रेत टॅटू काढल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. सुईची लागण झाल्यामुळे सर्वांना एचआयव्हीची लागण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.