सुभाष देसाईंनी एक हजार कोटींचा भ्रष्टाचार केला- इम्तियाज जलील
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केलाय. सुभाष देसाई यांनी तब्ब्ल १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी केला .
जलील आरोप करताना म्हणाले की-
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग येणं बंद झालं आहे. तर महाविकास आघाडीत उद्योग मंत्री राहिलेले आणि औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही उद्योग आणले नाहीत. सुभाष देसाई यांनी अधिकाऱ्यांना डावलून जमिनीचे व्यवहार केले. औरंगाबादमध्ये 60 लॅंड कंजर्वेशनसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयाप्रमाणे पैसे ठरले होते. राज्यातील 32 हजार हेक्टर लॅंड कंजर्वेशन संशयास्पद आहेत. असा गंभीर आरोप जलील यांनी देसाईंवर केला आहे. देसाई यांनी उद्योगमंत्री म्हणून उद्योग तर आणलेच नाहीत मात्र जाताजाता ते पैसे कमवून गेले असा टोलाही जलील यांनी सुभाष देसाई यांना लगावला आहे. बिल्डरांकडून कोट्यवधी रुपय घेऊन प्लॉट नियम बाह्य पद्धतीने देण्यात आले असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
Lokayukt Bill 2022:मुख्यमंत्री देखील लोकायुक्त कक्षेत असणार, असा आहे लोकायुक्त कायदा!
सुभाष देसाईच नाही तर त्यांच्या मुलांवरही आरोप जलील यांनी केला. या सगळ्या प्रकरणात देसाई यांचा मुलगा संबंधित बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवत होता. देसाईं बरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचावर अशाच प्रकारे आरोप केला. औरंगाबादेतील 32 हजार हेक्टर जमिनीचा वापराचा हेतू बदलण्यात आला आहे. तर 52 उद्योगांच्या जमिनीचे व्यावसायिक आणि रहिवाशी असा हेतू बदलण्यात आला आहे. राणेंनी अशाच प्रकारचा हेतू बदलल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला.