पुण्यात १०० तलवारी आणि २ कुकरी जप्त, औरंगाबादेत शस्त्रसाठा येणार होता
पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज मोठी कारवाई केली यात दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून तलवारीसह कुकरी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी ३.७ लाख रुपये किमतीच्या ९२ तलवारी आणि २ कुकरी आणि ९ स्काबर्ड जप्त केले आहेत. हा जप्त केलेला शस्त्रसाठा औरंगाबादला जाणार होता अशी माहिती कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांनी दिली.
दरम्यान, पाच दिवसंआधी औरंगाबाद शहरात अश्याच प्रकारे शास्त्र साठा क्रांती चौक पोलिसांनी जप्त केला होता. औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीला डिलेव्हरी साठी आलेल्या पार्सलमध्ये शस्त्रांचा मोठा साठा होता, याची माहिती कंपनीने पोलिसांना दिली, तात्काळ घटनासथळी धाव घेऊन त्या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या, या प्रकरण नंतर मोठी खळबळ उडाली होती. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाइन तलवारी खरेदी मागविणाऱ्यासह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी अटक करून आणखी 3 तलवारी जप्त केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिस चौकशीत या आरोपीने यापूर्वीही तलवारी खरेदी केल्याचे मान्य केले आहे. यातील एक तलवार त्याच्या घरात तर दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले होते.
दरम्यान, यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आठवड्यात क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेतले होते.