क्राईम बिटराजकारण

१०० कोटी वसुली प्रकरण ; अनिल देशमुख यांना क्लिन चीट ?

Share Now

१०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, आता चांदिवाल आयोगाचे कामकाज पूर्ण झाले असून सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नसल्याचे नमूद केले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्यामुळे देशमुखांना क्लिन चिट मिळणार, असल्याची शक्यता आहे .

२३ मार्चला सीलबंद अहवाल तयार होणार असून. आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी युक्तीवाद केला आहे. १०० कोटी वसुलीची गंभीर घटना दोघांनीही स्टेशन डायरीत नोंदवली नाही. स्टेशन डायरी हे पोलिसांकरता महत्वाचे साधन आहे त्याचा वापर केला नाही.

सचिन वाझेने १०० कोटी वसुलीबाबत वरिष्ठांकडे कधीच लेखी तक्रार केली नाही, असा युक्तिवाद हिरे यांनी केला. आणि परमबीर सिंग यांनी २० मार्च २०२१ आधी पर्यंत कधीच १०० कोटी वसुलीबाबत पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली नाही. २० मार्चपूर्वी १०० कोटी वसुली प्रकरण सुरु होते त्याची कुठे ही एफआयआर केली नाही, असाही युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना क्लिन चीट मिळण्याची दाट शक्यता आहे. परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे आरोप वैध नाहीत.

१०० कोटी वसुलीचे कुठेही आरोपाची नोंद नसल्याने अनिल देशमुख यांना दिलासा मिळू शकतो, असा निष्कर्ष या अहवालावरून काढला जात आहे. त्यामुळे आयोगाच्या अहवालानंतर अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळतो का हे पाहण्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *