१० रुपयांसाठी घेतला जीव, रिक्षा चालकांची वाढती मनमानी
औरंगाबाद – शहरात रिक्षा चालकांची मनमानी आणि दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे, रिक्षा चालक आणि प्रवाश्याचे वाद होतच असतात, परंतु एखादा वाद जीव घेऊ शकतो. काल शहरात १० रुपयांसाठी एका प्रवाशांला जीव गमवावा लागला आहे.
रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात दहा रुपयांवरून वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. दोघांमध्ये बाचाबाची, मारहाण झाली. या प्रवासी गंभीर जखमी झाला. शहरातील सिटी चौक पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
पैठण येथील कवडगाव येथून मंगळवारी मुजफ्फर हे सालमच्या रिक्षात बसले. मुजफ्फर हेदेखील रिक्षाचालक आहेत. सिटी चौकात गेल्यानंतर मुजफ्फर यांनी थोडे पुढे सोडण्यास सांगितले. सालम यांनी सोडलेही, पण ठरलेल्या भाड्यापेक्षा २० रुपये जास्त मागितले. त्यावरून मीसुद्धा ऑटोचालक आहे, दहाच रुपये देणार, असे म्हणताच त्यांच्यात वाद सुरु झाला.
संतापलेल्या मुजफ्फर यांनी थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दिली. तोपर्यंत त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन त्यांना घाटीत पाठवले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. नाकावर मार लागून घोळाणा फुटल्याने मागील बाजूला मेंदूला दुखापत झाली. या घटने मुजफ्फर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सालमला अटक करण्यात आली.