क्राईम बिट

धुळ्यातून ८९ तलवारी सह १ खंजीर जप्त ; नेमकं हा शस्त्रसाठा येतोय कश्यासाठी ?

Share Now

धुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहन तपासणी दरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनातून ८९ तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील चित्तौडगड येथून मुंबई-आग्रा महामार्गावर एक स्कॉर्पिओ वाहन तपासणीदरम्यान अडवण्यात आले.

हेही वाचा :- औरंगाबाद शहरातील १५ दिवसातील दुसरी घटना ; भरचौकात गुन्हेगाराला मारहाण
वाहनातून ८९ तलवारी सापडल्याने या प्रकरणाला राजकीय वेग आला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, काँग्रेसशासित राज्यात तलवारीने भरलेली गाडी काय करत होती.
शस्त्रे कुठे जात होती हे स्पष्ट नाही – पोलीस
धुळे येथील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सोनगीर गावातून स्कॉर्पिओ गाडी थांबवण्यात आली. ही शस्त्रे कोठे जात होती हे सध्या स्पष्ट झालेले नाही. वाहनाची झडती घेतली असता पोलिसांना ८९ तलवारी आणि एक खंजीर सापडला. यानंतर चार जणांना अटक करण्यात आली. पोलीस आता या लोकांना ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत स्थानिक न्यायालयात हजर करणार आहेत.

विकण्यासाठी तलवारी घेऊन जात होते, सोनगीर गावातील स्थानिक पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षकांनी सांगितले की, आरोपींनी सांगितले की ते जालन्यातील रहिवासी आहेत. आणि तेथे तलवारी विकण्यासाठी घेऊन जात होते. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “त्यांनी तलवारी कोठून विकत घेतल्या आणि तलवारी ठेवण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक परवानगी आहे का हे शोधण्यासाठी आम्ही चित्तोडगडमधील स्थानिक जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे तपास करू.”

भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले
त्याचवेळी भाजप नेते राम कदम यांनी या मुद्द्यावर विचारले की, काँग्रेसशासित राज्यातून मुंबईत तलवारी का आणल्या जात आहेत ? त्याचबरोबर ते कोणावरही हल्ला करण्यासाठी किंवा राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी आले आहेत का, असा सवालही त्यांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी मिळाल्याने राज्य सरकारने राज ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला, तर गृहमंत्र्यांवर एफआयआर नोंदवणार का, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.

हे ही वाचा (Read This) बर्ड फ्लूचा धोका वाढतोय,पोल्ट्री फार्म नष्ट करू शकतो, वेळीच ह्या उपायांनी प्रतिबंध घाला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *