राज्यातील १४ जिल्हे शंभर टक्के अनलॉक; मात्र औरंगाबादचा नंबर नाही
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्ण संख्या बऱ्यापैकी कमी झाल्याने आता केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केले आहेत.
राज्यातल्या १४ जिल्ह्यात ४ मार्च पासून सिनेमागृहे, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, आता शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, रायगड, सातारा, रत्नागिरी, गोंदिया, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर आणि पुणे या १४ जिल्ह्यांमध्ये नव्या गाईडलाईन्स ४ मार्च पासून जारी केले आहेत.