औष्णिक वीज प्रकल्पाचा काळा बाजार:- बीड गुन्हेगारीची काळी पाऊलं!
बीड जिल्ह्याचे राजकारण पूर्णतः गढूळ झालेले पहायला मिळत असताना आम्ही आपल्याकरता एक असं गुन्हेगारीचं समीकरण घेऊन आलो आहोत जे समजून घेतल्यानंतर तुम्ही अवाक होऊन जाल. संतोष देशमुख ज्या सरपंचाचा खुन झाला. दुसरीकडे वाल्मिक कराड हे नाव ज्यावर सध्या मकोका अर्थात मोक्का लावण्यात आला. एकुणचं या प्रकरणावरून आपण बीडबद्दल काय जाणून घेऊ शकलो यावर हा प्रकाश टाकण्यात येतो आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे औष्णिक वीज निर्मितीचे केंद्र आहे. इथून तयार होणाऱ्या वीजेचे थेट संबंध राज्य सरकार आणि गुन्हेगारीशी कसे जोडल्या गेले याविषयी ही सविस्तर माहिती. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून परिचित आहे. अशात येथील स्थानिकांना कोरडवाहू शेतीदेखील चांगल उत्पन्न निर्माण करु शकत नाही. ऊसतोडणी, कोरडवाहू शेती याव्यतिरिक्त शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे रोजगार जो की बीड जिल्ह्यात आम आय डी सी व्यतिरिक्त फारसा कुठे विकसीत होऊ शकला नाही.
यामुळे इंजिनिअरिंग वा इतर शिक्षण घेतलेली तरूणाई ही पैशांच्या शोधात असताना त्यांना जेव्हा काळ्या बाजारातल्या पैशांची व त्यातून मिळणाऱ्या चैनीची हाव दिसायला लागते तेव्हा साहजिकचं तरूणाई ही त्या दोन नंबरच्या म्हणवल्या जाणाऱ्या काळ्या धंद्याकडे ओढल्या जाऊ लागते. यामधून तरूणांची प्रचंड तगडी साखळी तयार होते.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही साखळी नेमकं करते काय? तर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणारा एक घटक म्हणजे राख. ही राख जी आहे ती राज्य सरकारकडे जाणं अपेक्षित असतं. परंतु असं घडत नाही. उदाहरणार्थ राखेचं उत्पन्न जर ५० टन झालं तर कागदोपत्री फक्त ते १० टन दाखवून इतर उर्वरित ४० टन राख ही थेट दुसऱ्या राज्यात तरूणांमार्फत पोहोचवल्या जाते.
ही राख दुसऱ्या राज्यात जरी पोहचली तरी तीचं नेमकं काय होत असेल असं तुम्हाला वाटतं?
तर याविषयीची बाब नीटपणे डोक्यात फिट्ट करून घ्या. घडतं असं की, ही राख जी आहे ती काही प्रमाणातले कॉन्क्रीटच्या वीटा बनविण्यात उपयोगात येते. काही प्रमाणात या राखेची विक्री ही शेतीकरताही केल्या जाते. म्हणजे थोडक्यात या काळ्या बाजारात तरूण पोरांना गुंतविल्या जातं, तेही राजकारण्यांकडून.
बीड परळी राजकारणात सक्रीय असणारी जी काही नावे असतील त्यांपैकी, धनंजय मुंडे – सुरेश धस – पंकजा मुंडे यांच्यासारख्या प्रभावशाली राजकर्त्यांना हा साधा सरळ स्पष्ट मुद्दा समजला नसेल का? कि त्यांनी मुद्दाम या गुन्हेगारीकडे दुर्लभ केलं आहे? असे बरेच सवाल आता उपस्थित होताना पहायला मिळतं आहेत.
तुम्हाला या गोष्टीबाबत काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समधे नमूद करू शकता.
अशाच अधिक परखड अन रोखठोक माहितीकरता आजचं “द रिपोर्टर” ला सबस्क्राईब करून ठेवा.
#beed #maharashtra #politics