आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी मुंबईला हलवलं

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

काल सायंकाळी त्यांच्या छातीत दुखत असल्यानं औरंगाबाद शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यानंतर आज सकाळी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. एअर अंबुलन्स ने संजय शिरसाट मुंबईला रवाना करण्यात आल आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आता डिजीलॉकरवर पेन्शन सर्टिफिकेट मिळेल, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्यावी

अस्वस्थ वाटत असल्याने काल दुपारी त्यांना औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर यांना औरंगाबादहून मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर जेव्हा आणण्यात तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगबगही पाहायला मिळाली. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यात यावं, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांना एअर एम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

आता सर्व युरिया खत कंपन्या, फक्त भारत युरिया बॅग या ब्रँड नावाखाली विकतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *