आदित्य ठाकरे कुठे होते? दिशा सालियनचा मृत्यूशी निगडित खुलासा !
दिशा सालियन मृत्यू प्रकरण: तिच्या पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, आदित्य ठाकरेंवर आरोप.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणासोबतच त्याच्या मॅनेजर दिशासालियनच्या मृत्यूनेही मोठी खळबळ उडवली होती. २०२० मध्ये दिशाचा मृत्यू झाला आणि त्याला आत्महत्येचा स्वरूप देण्यात आला. मात्र, त्यानंतर तिच्या हत्येच्या शक्यतेबाबतही अनेक तर्क-वितर्क लावले गेले. आता दिशाच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यात आदित्य ठाकरेंचं नाव असल्याची चर्चा आहे.
काय आहे याचिकेतील आरोप?
८ जून २०२० च्या रात्री, दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या काही मित्रांसह एक पार्टी सुरू होती. प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांनुसार, या पार्टीदरम्यान अचानक आदित्य ठाकरे, त्यांचे अंगरक्षक, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया तिथे पोहोचले, आणि त्यानंतर पार्टीचं वातावरण बदललं. याच रात्री दिशाला कायमचं शांत करण्यात आलं, असा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेत केला आहे.
या घटनेनंतर अनेक राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सक्रिय झाले. तसेच, आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आणि दिशाच्या काही जवळच्या व्यक्तींशी वारंवार संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांनंतर सुशांतसिंह राजपूतचाही संशयास्पद मृत्यू झाला.
आदित्य ठाकरेंचा बचाव
या प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जात असलं, तरी त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. २०२२ मध्ये एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, दिशाच्या मृत्यूच्या दिवशी ते रुग्णालयात होते. त्यांच्या आजोबांवर (रश्मी ठाकरे यांचे वडील) उपचार सुरू होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आता याच प्रकरणावर कोर्टात आपली बाजू मांडण्यास ते तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “सत्य बाहेर येईल” असं म्हणत त्यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.