आता टी-२० वर्डकप चित्रपटगृहात पाहता येणार
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेटचे लाईव्ह सामने आता चित्रपट गृहात पाहता येणार आहेत. त्यामुळे आता टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांचा आनंद चित्रपट गृहात घेता येणार आहे.
YouTube च्या जाहिरातींना परेशान झालात का? मग ‘हे’ करून फक्त १० रुपयात जाहिरात फ्री व्हिडिओ पहा
आयनॉक्स या मल्टीप्लेक्स कंपनीने आयसीसीसोबत करार केला आहे. यामुळे आयनॉक्स सिनेमागृहामध्ये क्रिकेट चाहत्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने लाईव्ह पाहता येणार आहेत. देशभरातील आयनॉक्स सिनेमागृहांमध्ये वर्ल्ड कपच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. टी-२० पुरुष विश्वचषकमध्ये भारत खेळणार असणारे सर्व सामने देशभरातील चित्रपट गृहामध्ये लाईव्ह दाखवणार आहेत.
रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी हे काम विसरू नका, खत-खतापासून ते बियाणे-पाण्याचा खर्च वाचू शकता
२३ ऑक्टोबर रोजी भारताचा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानविरोधात रंगणार आहे. यानंतर भारताचे विश्वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांचं आयनॉक्स थिएटरमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. भारतीय संघाचे सर्व लाईव्ह सामने २५ हून अधिक शहरांमध्ये दाखवले जाणार आहेत. किक्रेटप्रेमींसाठी हा एक नवा अनुभव असणार आहे.