राजकारण

शर्मिला ठाकरे यांचा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर हल्ला, लाडकी बहीण योजनेवर टीका

शर्मिला ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत भाषण केले, त्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर, लाडकी बहीण योजनेवरून देखील तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “बहीणांना १५०० रुपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे,” आणि महिलांना १५०० रुपये भिक म्हणून देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आनंदाच्या शिधावरून एकनाथ शिंदे आणि मोदींवर केली टीका

शर्मिला ठाकरे यांचा आरोप होता की, “स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सर्व पक्ष सत्ता मध्ये होते, मात्र कोळी वस्त्यांमध्ये स्थिती अजूनही बिकट आहे. २५ वर्षे सत्तेत असलेली शिवसेना आणि इतर पक्ष गटरांवर झाकण लावू शकत नाहीत. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नाही,” असेही त्या म्हणाल्या.

शर्मिला ठाकरे यांची भाषणे तीव्रपणे सत्ताधारी पक्षांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होती. त्याचवेळी, त्यांनी मनसेच्या ठाणे विधानसभा उमेदवार अविनाश जाधव यांचा पाठिंबा देत, त्यांचे २४ तास आपल्या लोकांसाठी उपलब्ध राहण्याचे आश्वासन दिले.

यावेळी, मनसे नेते अभिजीत पानसेंनी देखील अविनाश जाधव यांचा पाठिंबा दर्शवला आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *