महाविकास आघाडीला 25 ते 30 जागा मिळतील?
महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले असून आज अखेरचा पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.मुंबईसह ठाणे, कल्याण आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर अखेरच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. धुळ्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुद्धाचा थेट सामना रंगला असून भाजपकडून डाॅ. सुभाष भामरे रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या शोभा बच्छाव आहेत.
Indian Navy: जर तुम्हाला भारतीय नौदलात करिअर करायचे असेल तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी.
महाविकास आघाडीला 25 ते 30 जागा मिळतील?
धुळे शहरातील एमआयएमचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, यंदा जनता जागृत झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 25 ते 30 जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. फारुक यांनी बोलताना सांगितले की, नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करून बदल घडवायचा आहे. दुसरीकडे, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Government JOBS:भारतीय लष्कर ते हवाई दल, भरपूर सरकारी नोकऱ्या, लगेच अर्ज करा
दरम्यान, भाजपकडून सुभाष भामरे धुळ्यात तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. वंचितचा उमेदवार नसल्याने धुळे मतदारसंघात मतविभाजन होणार नाही, त्यामुळे याचा लाभ कोणाला होणार? याचीही चर्चा आहे. भामरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या आणि धुळ्याच्या माजी पालकमंत्री शोभा बच्छाव या रिंगणात आहेत. मुस्लीमबहुल धुळे, मालेगाव, दोंडाईचा, सोनगीर, नरडाणा याठिकाणी मुस्लिम, दलित, आदिवासी यांची मते काँग्रेससाठी जमेची बाजू असणार आहेत. काँग्रेस ही मते आपल्याकडे खेचण्यास यशस्वी झाल्यास भामरे यांना आव्हान निर्माण होऊ शकते.
संदीपान भूमरेंना नापसंती!
Latest:
- पिकांसाठी मुख्य पोषक तत्व का महत्त्वाचे आहे, त्याच्या कमतरतेची लक्षणे आणि परिणाम काय आहेत?
- कणीस येण्याच्या वेळी किती पाणी द्यावे आणि खतांचे प्रमाण देखील जाणून घ्या.
- कापूस शेती: कापसाच्या बंपर उत्पादनासाठी किती खतांची आवश्यकता आहे, सिंचनाबद्दल देखील जाणून घ्या
- मिरचीची ही विविधता आहे अप्रतिम, जाणून घ्या घरच्या घरी बिया ऑर्डर करण्याची सोपी पद्धत